Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो, जात प्रमाणपत्र (Cast Validity) त्रुटी पूर्तता मोहीमेचा लाभ घेण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन…

0

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ वर्षात १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशघेतलेले तसेच सेवा व निवडणूक प्रयोजनार्थ जातप्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल केलेले मागासवर्गीय विद्यार्थी तसेच उमेदवार यांच्याकरिता जातप्रमाणपत्र पडताळणी समितीतर्फे विशेष मोहीम आयोजित केली आहे. ऑनलाईन दाखल केलेल्या अर्जात आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी २२ ते २४ व २९ ते ३१ जानेवारीदरम्यान त्रुटी पूर्तता शिबिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित केले आहे अशी माहिती प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी दिली.