आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड कसे काढायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती
प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेतील लाभार्थ्यांची निवड सामाजिक- आर्थिक जात गणना (एसईसीसी – 2011 ) च्या आधारे या योजनेतर्गत लाभार्थ्यांची निवड केली जाते. जे व्यक्ती या योजनेत पात्र असतील अशा व्यक्तींना शासकीय खासगी रुग्णालयात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार केला जाऊ शकतो. आपण या लेखात आयुष्मान भारत जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड ऑनलाईन डाऊनलोड कसे करायचे ते सविस्तर पाहणार आहोत.
आरोग्य विमा आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे फायदे:- सूचीबद्ध दुय्यम आणि तृतीयक काळजी अटींसाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वार्षिक ₹ 5,00,000 पर्यंतचे कॅशलेस कव्हर प्रदान करते. योजनेतील कव्हरमध्ये उपचाराच्या खालील घटकांवर झालेला सर्व खर्च समाविष्ट आहे.
आयुष्मान कार्ड ऑनलाईन डाऊनलोड करण्याची प्रोसेस:- आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हेल्थ कार्ड ऑनलाईन डाउनलोड करण्यासाठी खालील आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
https://beneficiary.nha.gov.in आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची अधिकृत वेबसाईट ओपन केल्यानंतर Beneficiary वर क्लिक करून Captcha कोड,मोबाईल नंबर व ओटीपी टाकून लॉगिन करा.