Take a fresh look at your lifestyle.

AI चा कोर्स करा आणि मिळवा लाखो रुपयांचा पगार…

0

आज मोठ्या कंपन्या AI ची समज आणि तंत्रज्ञान असलेल्या लोकांच्या शोधात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात अभ्यास असमाऱ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) हे आजच्या युगातील सर्वात फायदेशीर करिअरपैकी एक आहे. आज, AI द्वारे, लोक तासभर लागणारे काम काही मिनिटांत पूर्ण करु शकतात. अशा परिस्थितीत, आज मोठ्या कंपन्या AI ची समज आणि तंत्रज्ञान असलेल्या लोकांच्या शोधात आहेत. त्यामुळे या क्षेत्रात अभ्यास असमाऱ्यांना नोकरीच्या मोठ्या संदी आहेत.

जेव्हा एखादे यंत्र मनुष्यासारखा विचार करुन कोणतेही काम करू लागते, तेव्हा त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतात. या विषयावर टर्मिनेटर, ब्लेड रनर, स्टार वॉर, मॅट्रिक्स, आय रोबोट असे अनेक हॉलीवूडपट बनले आहेत. या तंत्रज्ञानात यंत्र माणसाचे काम सोपे करते. ही गुणवत्ता जगभरातील अनेक कंपन्यांना आकर्षित करत आहे. AI चा वापर समस्यांचे निराकरण, नवीन योजना, नवीन कल्पना शोधण्यासाठी केला जाऊ शकतो. सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चॅटबॉट, चॅटजीपीटीचा वापर चर्चेत आहे.

कशी कराल करिअरची सुरुवात?

एआय क्षेत्रात उत्तम करिअर करण्यासाठी संगणक विज्ञान आणि गणिताचे ज्ञान आवश्यक आहे. अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर तुम्ही या क्षेत्रात करिअर करू शकता. ही पदवी कॉम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, मॅथ्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स या विषयांमध्ये असावी. काही संस्थांमध्ये, एआय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देखील घेतल्या जातात, ज्यात पात्रता असणे आवश्यक आहे. संगणक विज्ञान पदवीधर उमेदवार देखील या क्षेत्रात काम करू शकतात. B.Tech/M.Tech पदवीधर, BCA/MCA पदवीधर, B.Sc IT/MSc IT पदवीधर, सॉफ्टवेअर अभियंता/डेव्हलपर्स/वास्तुविशारद देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोर्स करू शकतात. जर उमेदवाराला ग्रॅज्युएशन दरम्यान सांख्यिकी, संभाव्यता सिद्धांत, रेखीय बीजगणित यासारखे मूलभूत ज्ञान तसेच UNIX साधने आणि प्रगत सिग्नल प्रक्रिया तंत्रांची चांगली माहिती असल्यास, तो या क्षेत्रात उच्च स्तरावर पोहोचू शकतो. या क्षेत्रातील शक्यता आणि करिअर वाढीला मर्यादा नाही.

कुठे कराल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कोर्स ?

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चंदीगड विद्यापीठ, चंदीगड

एसआरएम ईश्वरी अभियांत्रिकी महाविद्यालय, चेन्नई

किंग्ज कॉर्नरस्टोन इंटरनॅशनल कॉलेज, चेन्नई

सविता अभियांत्रिकी महाविद्यालय, चेन्नई

इंद्रप्रस्थ इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IIIT), नवी दिल्ली