आरटीई प्रवेश 2025 करीता वयोमर्यादेत बदल; नवीन नियम पहा
पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची दरवाजे उघडणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना अखेर अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार पालकांना आपल्या मुलांचे अर्ज मंगळवार, दि. १४ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान भरता येणार आहेत.
आर्थिक दुर्बल आणि बंचित घटकांतील विद्याध्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाते. संबंधित विद्याध्यचेि शुल्क सरकारमार्फत संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्तीच्या माध्यमातून देण्यात येते.
यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबर २०२४ ला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली.
नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली. परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे ४ जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली. सध्या आरटीई पोर्टलवर दिसत असलेल्या आकडेवारीनुसार ८ हजार ८४९ शाळांची नोंद झाली असून, १ लाख ८ हजार ९६१ जागा उपलब्ध झाल्या आहेत.
अर्ज सादर करण्याअगोदर तुमचा मुलगा/मुलगी पात्र आहे का नाही हे पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि वयोमर्यादेची माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी खाली सर्व डिटेल्स दिल्या आहेत त्या वाचा अर्ज करा.
2025-26 साठी अर्ज कोण करू शकतो
वय वर्ष 3+ पासून वय वर्ष 6+ पर्यंत आर्थिक वंचित गटातील मुले-मुली येथे अर्ज करू शकतात या नियमामध्ये बदल झाल्यास सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.
https://student.maharashtra.gov.in या पोर्टल वर जावे, सर्वप्रथम विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी त्यानंतर जुना पासवर्ड बदलून घ्यावा. नवीन पासवर्ड ने लॉगिन करावे, विद्यार्थ्यांची मूळ माहिती भरावी व नंतर अर्ज भरावा अर्ज भरल्यानंतर जवळच्या शाळेची निवड करावी व अर्ज सबमिट करावा.