‘या’ लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळणार नाही…
राज्यातील महिलांसाठी सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी आली आहे.
डिसेंबरचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. मात्र आता 26 जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे.
याशिवाय येत्या तीन ते चार दिवसांमध्ये पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तसेच लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देखील लवकरच मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
मात्र आता ज्या महिलांच्या उत्पन्नात वाढ झाली त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. याशिवाय ज्या महिलांनी वेगवेगळ्या योजनांसहित या योजनेचा लाभ घेतला आहे, अशा महिला या योजनेतून कमी होणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.