Take a fresh look at your lifestyle.

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाचे, आपली ‘ही’ सेवा झाली बंद…

0

▪️ रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून आता ई – रेशनकार्ड येणार असून रेशन कार्डची छपाई बंद होणार आहे. आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही. कारण आता रेशनकार्ड छपाई बंद करण्यात आली आहे. पण तुमच्याकडे असलेले जुने रेशन कार्डही उपयोगात राहणार आहे.

▪️ उत्पन्न गटानुसार आपल्याकडे रेशनकार्डचे वर्गीकरण केलेले असून दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशनकार्ड दिले जाते. सामान्य कुटुंबासाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना पिवळे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते.

▪️ आता रेशनकार्डांची छपाईच आता बंद होणार असल्याने ई- रेशन कार्डमध्ये याचं वर्गीकरण होताना ई – रेशन कार्डवरही लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे.

▪️ तुम्ही आता नव्याने रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई- शिधापत्रिकाच मिळणार आहे. तसंच ज्यांच्याकडे छापलेली शिधापत्रिका आहे, त्यांना जर दुय्यम ई – रेशन कार्ड हवं असेल तर त्यांना त्यासाठीही अर्ज करता येणार आहे.