प.न लुंकड कन्या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
भारतातील पहील्या स्त्री शिक्षिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त्र स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिन म्हणून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या सकाळ विभागाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.मीना सपकाळे मॅडम तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सांस्कृतिक प्रमुख सौ.रागिणी पुराणिक मॅडम होत्या. सदर कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थीनींनी ओव्या,कविता व आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सौ.सुरेखा देवरे मॅडम यांनी विद्यार्थिनींना स्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले. सौ.रागिणी पुराणिक मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली. कार्यक्रामाचे सूत्रसंचलन कु. प्राजक्ता शिंपी व कु.ओवी महाजन यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे अनमोल मार्गदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका मा.राजश्री शिंदीकर मॅडम, उपमुख्याध्यापक श्री.अनिल सैंदाणे, पर्यवेक्षिका सौ.लीना कुलकर्णी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन श्री. प्रवीण धनगर, सौ.वंदना वाणी,सौ.सुरेखा देवरे,सौ.सुनीता उपासनी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री. जितेंद्र खंडाळकर,श्री.सुरेश श्रीवंत,श्री.कैलास सूर्यवंशी,श्रीमती उर्मिला सैंदाणे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.