अर्ज तपासणी नंतर ‘या’ लाडक्या बहिणी अपात्र ठरणार…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे.
आता या योजनेचा लाभ घेणाऱ्या सगळ्याच भागातील लाभार्थी महिलांची फेरतपासणी होणार असल्याचं आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे.
तसेच अद्यापही काही अर्जांची छाननी होण्याचं काम बाकी आहे. मात्र त्या अर्जांची देखील आता छाननी काटेकोर पद्धतीनं होणार आहे.
कोणत्या महिला अपात्र ठरणार
▪️वार्षिक एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल,तर अपात्र ठरणार.
▪️आधार आणि बँक नावात तफावत असेल तर त्या महिला अपात्र ठरतील.
▪️ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही..
▪️या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आला आहे.
▪️ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही.
▪️कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील तर अशा महिला अपात्र ठरतील.
▪️तसेच इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.