शासनाच्या ‘या’ योजनेत तुमचं नाव आहे की नाही? अशाप्रकारे चेक करा…
सरकारने राज्यातील महिलांना आर्थिकदृष्या सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेला जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येत आहेत.
आत्तापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंतचे पैसे महिलांच्या बँक खात्यावर जमा देखील झाले आहेत. अशातच आता डिसेंबर महिन्याचे पैेसे नेमके कधी जमा होणार याची सर्वांना प्रतीक्षा लागली आहे.
मात्र या योजनेत तुमचं नाव आहे की नाही चेक करण महत्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला mahaitgov.in या वेबसाइटवर जाऊन तुमचे या योजनेचे स्टेटस दिसेल.