Take a fresh look at your lifestyle.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात अत्यंत महत्वाचे अपडेट…

0

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्वाची बातमी आहे. लाडकी बहीण या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 15 ऑक्टोबरपर्यंत देण्यात आली होती.

त्यानंतर 16 ऑक्टोबरला विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाली आणि आचारसंहित लागली. या योजनेतील ज्या महिलांच्या आर्जाची छाणणी बाकी होती, ती तेव्हा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडली.

मात्र आता आचारसंहिता संपल्यानंतर उर्वरीत अर्जाची छाणणी प्रक्रिया लवकर सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर लाभार्थी महिलांची अंतिम यादी बनवण्यात येणार आहे.

यावेळी ज्यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, त्या त्रुटी दूर करून अर्जदारांनी पुन्हा अर्ज भरावे असं सांगण्यात आलं आहे.