Take a fresh look at your lifestyle.

टू – व्हीलर वर मागे बसणाऱ्यांनाही भरावा लागेल दंड; हेल्मेट सक्तीची नवीन अंमलबजावणी

0

पुण्यासह राज्यात पुन्हा हेल्मेट सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे आता दुचाकीचालकासह त्याच्या सहप्रवाशाला देखील हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे.

वाढते अपघात व मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल आहे. त्यामुळे आता हेल्मेट नसल्यास मोठा दंड भरावा लागणार आहे. चालकाबरोबरच आता दुचाकीवरील सहप्रवाशालाही हेल्मेट परिधान करावे लागणार आहे.

पोलिसांकडून मोटार वाहन कायदा 1988 मधील तरतुदीप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकी चालकावर कारवाई होत नसल्याचे दिसून आले. हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आला. राज्याच्या वाहतूक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांनी याबाबतचा आदेश राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.