Take a fresh look at your lifestyle.

शिष्यवृत्ती प्रलंबित अर्जांना ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत – महाडीबीटीकडे ऑफलाइन अर्ज देण्याची मुभा

0

महाडीबीटी संकेतस्थळावर विविध कारणांमुळे प्रलंबित राहिलेल्या शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज सादर करण्यास परवानगी दिली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. महाडीबीटी संकेतस्थळाद्वारे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनांचा लाभ देण्यात येतो. २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविताना विविध अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांनी मुदतीमध्ये अर्ज भरूनही अर्ज ऑटो रिजेक्ट होणे, परीक्षेचा निकाल वेळेत न लागल्याने अर्ज भरता न येणे, अर्ज भरूनही पुढील वर्षीचा अर्ज नूतनीकरण करण्यात अडचण येणे अशा अडचणींना विद्यार्थ्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळत नसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर विभागस्तरावर निर्णय घेण्याचा अभिप्राय माहिती – तंत्रज्ञान विभागाने दिला होता. त्यामुळे शिष्यवृत्ती फ्रीशिप योजनेअंतर्गत प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठीची कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे.

अर्ज नामंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी – शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने महाडीबीटीवर अर्ज नामंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना त्याचे आधार प्रमाणपत्र सादर करून अर्ज ऑफलाइन सादर करता येणार आहे. ऑनलाइन अर्ज भरुन महाडीबीटी प्रणालीवर अर्ज नामंजूर झालेल्या विद्यार्थ्यांनाही ऑफलाइन अर्ज सादर करता येईल.

शिष्यवृत्ती ऑफलाइन अर्जासाठी मुदतवाढ – विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी निर्णय – राज्य सरकारच्या महाडीबीटी संकेतस्थळावरील शिष्यवृत्तीचे अर्ज प्रलंबित राहिलेल्या २०१८-१९ ते २०२३-२४ या वर्षातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना आता ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तसेच २०२४- २५ शैक्षणिक वर्षासाठी नवीन आणि जुन्या उमेदवारांच्या शिष्यवृत्तीचे नूतनीकरण अर्ज करण्यासाठी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदतवाढ दिल्याची सूचना महाडीबीटी वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.

२०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीत ‘महाडीबीटी’ मार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविताना विविध अडचणी आल्या. त्यात मुदतीत अर्ज भरूनही अर्ज आपोआप नाकारला गेला होता.

‘आधार प्रमाणपत्र – सादर करा’ शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना आधार नोंदणी न केल्याने ‘महाडीबीटी’ वर अर्ज नामंजूर झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे आधार प्रमाणपत्र महाविद्यालयात सादर करून अर्ज ऑफलाइन सादर करता येईल.