Take a fresh look at your lifestyle.

भविष्य निर्वाह निधी (PF) अकाउंटचे केवायसी अपडेट करण्याची ऑनलाईन प्रोसेस…

0

केवायसी (PF KYC Update ) अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम ईपीएफओ युएएन पोर्टल https://unifiedportal-

mem.epfindia.gov.in/memberinterface / वर जाऊन तुम्ही लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी तुमचा UAN नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करायचे आहे. पहिल्यांदाच लॉगिन करत असाल तर UAN नंबर ऍक्टिव्हेट करावा लागेल. केवायसी अपडेट (PF KYC Update ) करताना Manage टॅब मध्ये खालील पर्याय मध्ये बदल करायचा आहे.

• Basic Details

• Contact Details

• KYC

मूलभूत तपशील सुधारित करा:

• जर तुम्हाला आधार नंबर, नाव, जन्म तारीख, लिंग व कंपनीचे नाव यामध्ये बदल कसा करायचा असेल तर Manage या ऑपशन वर जाऊन Basic डिटेल्स ऑपशन वर क्लिक करा.

• यामध्ये तुम्ही आधार नंबर, नाव, जन्म तारीख, लिंग व कंपनीचे नाव यामध्ये बदल करू शकता.

• सर्व माहिती टाकल्यावर Update या ऑपशन वर क्लिक करा व नंतर जो Confirmation मासे येईल तिथे Yes वर क्लिक करा.

• त्यानंतर तुमची माहिती व्हेरिफाय होईल. संपर्क तपशील बदला:

• जर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि मेल ID अपडेट करायचा असेल तर पुन्हा Manage या ऑपशन वर जाऊन Contact Details या ऑपशन वर क्लिक करायचे आहे.

तिथे तुम्हाला Change Mobile Number व Change Mail id वर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि मेल id टाकायचा आहे. व Get Authorization Pin वर क्लिक करा व OTP नंबर टाका. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि मेल ID अपडेट होतील.

पूर्ण केवायसी अपडेट करण्यासाठी पुन्हा Manage या ऑपशन वर जाऊन KYC या ऑपशन वर क्लिक करा.

पॅन, आधार, बँक अकाउंट या सेक्शनमध्ये जाऊन एक एक पर्यायावर क्लिक करा. तुमची माहिती भरा आणि सबमिट करा. तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होईल ते

पडताळून पाहायला तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये सांगू शकता. ते व्हेरिफाय झालं की ऑनलाईन सुविधा सुरू होईल,

युएएनशी संबंधित केवायसी मध्ये आधार नंबर, बँक अकाउंट नंबर, पॅन आणि मोबाइल नंबर लागतो. जेव्हा PF खातेधारक केवायसी युएएनसोबत लिंक करतो, तेव्हा PF संबंधी माहिती

मोबाइलवर मिळवू शकतो. केवळ आधार कार्ड, पॅन यासारख्या सत्यापित केवायसीची सेवा कोणत्याही सेवेचा लाभ घेण्यासाठी विचारात घेण्यात येईल. तुम्हाला PF काढायचा असेल आणि केवायस अपडेट असेल तर 3 दिवसांत पैसे मिळू शकतात