मंत्रिमंडळ बैठकीत झालेले ठळक निर्णय….
– मुंबईतल्या पाच प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ
– आगरी समाजासाठी महामंडळ
– समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम
– दमणगंगा एकदरे, दमणगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड योजनेस मान्यता
– वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता
– राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित
– पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी
– खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य
– पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता
– किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज; समान हप्त्यात परतफेडीस मान्यता
– अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ
– मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे
– खंड क्षमापीत झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू
– अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास महामंडळासाठी अभ्यासगट
– कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव