Take a fresh look at your lifestyle.

ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन ; शासन निर्णय जारी…

0

ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सुशिक्षीत बेरोजगार तरुणांकरीता शेतीपूरक व्यवसाय, विपणन, प्रक्रिया, उद्योग, पुरवठा आणि साठवणूक याचंबरोबर लघु उद्योग,वाहतुक,अन्य व्यावसायिक उद्योग उपलब्ध करुन देणे किंवा त्यास अर्थसहाय्य करुन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे तसेच आर्थिक स्तर उंचावण्यासाठी ब्राह्मण

 

 

समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय दिनांक २३.०९.२०२४ रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये झाला आहे. त्यानुसार ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ८ अंतर्गत शासकीय हमी असलेली व भाग भांडवल नसलेली कंपनी म्हणून परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आली आहे.