Take a fresh look at your lifestyle.

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना चराई अनुदान योजना

0

राज्यातील भज-क प्रवर्गा साठी – राजे यशवंतराव होळकर महामेष योजना चराई अनुदान योजना, शेळी २ मेंढी पालानाकरिता १ गुंठा जागा खरेदी योजना व परसातील कुकूटपालन योजनेसाठी अर्जदारांकडुन ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. महामेष योजेनचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील याची नोंद घ्यावी. तरी इच्छुक अर्जदाराने महामेष योजने अंतर्गत विहित कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत.

योजनेची वैशिष्टे :-

१. ९ मेंढी पालन व्यवसाय हा पुर्णपणे स्थलांतरित पध्दतीने केला जातो. मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पाण्याच्या शोधात साधारणपणे माहे ऑक्टोबर पासून भटकंती करीत असतात. भटकंती काळात मेंढपाळ त्यांच्या मेंढ्याकरिता चारा व पिण्याचे पाण्याच्या शोधात सतत स्थलांतरण करत असतात. पावसाळी हंगामामध्ये मुळस्थानी मेंढपाळ परत आल्यानंतर त्या भागामध्ये पाऊस फार अत्यल्प होत असल्यामुळे चारा उपलब्ध होत नाही.

२. जुन ते ऑक्टोबर या काळात मेंढपाळ नजीकच्या स्थानिक ठिकाणी, नदी किनारी, शेतकऱ्यांच्या बांधावर तसेच नजीकच्या वन क्षेत्रावर त्यांच्या मेंढ्यांची चराई करीत असतात. हल्लीच्या काळामध्ये शेतकरी शेतामध्ये तणनाशक तसेच कीटकनाशक औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे. तसेच राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगीकरण सुरू असल्यामुळे बऱ्याच रसायन कंपण्यामधील कचरा पाणी नदी- नाल्यामध्ये सोडण्यात येते. त्यामुळे भटकंती काळात मेंढ्यांचा संपर्क या विषारी रसायनांसी आल्यामुळे विषबाधा होण्याचे प्रकार नेहमी घडत असतात. यामुळे मेंढपाळांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. दिवसेंदिवस ही समस्या वाढत असल्यामुळे या कालावधी मध्ये त्यांच्या मेंढ्यांना चारा उपलब्ध करणेकरिता मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे चराई करिता शासनाकडून अर्थ सहाय्य उपलब्ध झाल्यास त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक :- www.mahamesh.org