Take a fresh look at your lifestyle.

थकबाकीदारांसाठी महावितरण विभागाची अभय योजना…

0

मागील सर्व योजनांचा आढावा घेऊन आणि त्या योजनांना मिळालेल्या प्रतिसादामुळे जास्तीत जास्त कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असणाऱ्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक लाभदायक अभय योजना राबविणे सद्यस्थितीत गरजेचे आहे. तसेच, महावितरण अभय योजने अंतर्गत ग्राहकांना त्यासोबतच पुनर्जोडणी / नवीन वीज जोडणीची सुविधा उपलब्ध करून दिल्यास महावितरणच्या थकबाकी वसुलीच्या प्रमाणात वाढ होईल.

पात्रतेचे निकष :- दिनांक ३१.०३.२०२४ रोजी किंवा त्यापूर्वी कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेले सर्व उच्चदाब व लघुदाब ग्राहक (कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक वगळून) महावितरण अभय योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील.

महावितरण अभय योजनेसाठी ३१ मार्च २०२४ पर्यंतची थकबाकी निश्चित करण्यात आली आहे. वितरण फ्रँचायझी क्षेत्रातील महावितरणच्या काळातील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेले थकबाकीदार ग्राहक देखील या योजनेत सहभागी होण्यास पात्र आहेत. वितरण फ्रँचायझी क्षेत्रामध्ये ग्राहकांसाठी देय रक्कम संबंधित वितरण फ्रँचायझीच्या

योजनेचे फायदे आणि निकष :-

१) कायमस्वरूपी वीज पुरवठा करारातील तरतुदीनुसार असेल. खंडित असलेल्या ग्राहकांनी संपूर्ण मुळ थकबाकी (मुद्दल) भरल्यास १००% व्याज आणि विलंब आकार माफ केले जाईल. तसेच कायमस्वरूपी (PD) वीज पुरवठा खंडित केलेल्या तारखेपासून अर्जाच्या तारखेपर्यंत कोणतेही व्याज आकारले जाणार नाही.

२) ग्राहकांना थकबाकीची देय रक्कम १००% एकरकमी भरण्याचा किंवा किमान ३०% डाऊनपेमेंटसह जास्तीत जास्त ०६ हफ्त्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

३) उच्चदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी (मुद्दल) एकरकमी भरल्यास त्यावर ५% अतिरिक्त सवलत मिळेल तसेच लघुदाब ग्राहकांनी मुळ थकबाकी एकरकमी भरल्यास त्यावर १०% अतिरिक्त सवलत मिळेल.

ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक 

https://wss.mahadiscom.in/wss/wss