Take a fresh look at your lifestyle.

भव्य आरोग्य शिबीराचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन…

0

जळगांव(प्रतिनिधी)- रिद्धी जानवी फाउंडेशन जळगाव तसेच भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिटणीस चित्रलेखा मालपाणी यांचा वाढदिवसा निमित्ताने गरजू रुग्णांची सेवा करण्याच्या हेतूने भाजपा वाल्मिक नगर, परिसर मंडळ क्रमांक २ आणि रिद्धी जानवी फाऊंडेशन गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील चौबे स्कूल, वाल्मिकनगर, जळगाव येथे उद्या ३० ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत भव्य शिबिराचे आयोजन केले आहे. यात डोळे, हृदयरोग, लिव्हर, पोटाचे व अन्ननलिकेचे व पित्ताशयाचे आजार यावरील तपासण्या होणार आहेत.

या सर्व तपासण्या व उपचार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत करण्यात येणार आहेत. या सर्व तपासण्या आणि उपचार गोदावरी फाऊंडेशन संचलित, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालय मार्फत केल्या जाणार आहेत. तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.