Take a fresh look at your lifestyle.

आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवली; या तारखेपर्यंत करा अपडेट…

0

नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. ग्रामीण भागात इंटरनेट, वीजेचा त्रास पाहता ही मुदत वाढ केली आहे.

आधार कार्डला दहा वर्षांपेक्षा अधिक काळ झाला असेल तर ते तात्काळ अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशातील कोट्यवधी जनतेला त्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी खर्च करावा लागणार नाही.

काय आहे तारीख :- आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची यापूर्वीची तारीख 14 मार्च होती. त्याला 14 जून, 2024 रोजीपर्यंत मुदत वाढ देण्यात आली होती. ही डेडलाईन जवळ येताच पुन्हा एकदा मुदत वाढीचा निर्णय घेण्यात आला. आता आधार कार्ड धारकांना 14 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत आधार कार्ड मोफत अपडेट करता येणार आहे.

याविषयीची माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिली आहे. त्यामुळे नागरिकांना या काळात आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन सुविधेचा लाभ घेता येणार आहे. तसेच ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे.