Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई उपनगर जिल्ह्यात सहायक आयुक्त, समाजकल्याण अंतर्गत २ मुलींचे व ४ मुलांची अशी एकूण ६ शासकीय वसतिगृहे आहेत. या वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहण्याची, भोजनाची मोफत सुविधा असून विद्यार्थ्यांना मासिक निर्वाहभत्ता, स्टेशनरी रक्कम देण्यात येते. या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून प्रवेशाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, मुलुंड (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) या विद्यार्थ्यांनीकरिता असलेल्या वसतिगृहात १०० विद्यार्थी मंजूर क्षमता असून २० रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता- पार्श्वनाथ कॉ.हौ.सो., D-१०,सर्वोदय नगर, मुलुंड (पश्चिम) जैन मंदिराजवळ, मुंबई -८०.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज मुलांचे शासकीय वसतिगृह, कांदिवली (गुणवंत विद्यार्थ्यांचे वसतिगृह) या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात मंजूर विद्यार्थी क्षमता १०० असून ३० रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता- ठाकूर संकुल, व्हिडिओकॉन टॉवर समोर, कांदिवली (पू) मुंबई-१०१.

महात्मा ज्योतिराव फुले मुलांचे शासकीय वसतिगृह, जोगेश्वरी या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात १५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून ३२ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – चांदीवाला कंपाऊंड, अक्सा मशीद रोड, मिल्लत हॉस्पिटलच्या मागे, जोगेश्वरी (प).

संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात १५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून ३६ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – आर.सी. चेंबूरकर मार्ग, जैन मंदिर समोर, बेगर होम कंपाऊंड जवळ, चेंबूर मुंबई-७१

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह, चेंबूर युनिट १ ( विभागीय स्तर) या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या वसतिगृहात २५० विद्यार्थी मंजूर क्षमता असून २५ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – महिला व बालविकास विभाग यांचे शासकीय निवासस्थान, आर.सी. चेंबूरकर मार्ग, संत एकनाथ मुलांचे शासकीय वसतिगृहाजवळ, जैन मंदिर समोर, चेंबूर मुंबई -७१

माता रमाई आंबेडकर मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह चेंबूर युनिट ४ ( विभागीयस्तर) या विद्यार्थिंनीकरिता असलेल्या वसतिगृहात २५० विद्यार्थी संख्या मंजूर असून ८२ रिक्त जागा आहेत. वसतिगृहाचा पत्ता – आर.सी. चेंबूरकर मार्ग, जैन मंदिर समोर, बेगर होम कंपाऊंड जवळ, चेंबूर मुंबई-७१. असा आहे, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.