Take a fresh look at your lifestyle.

बालसंगोपन योजनेतंर्गत बालकांना मिळणार २ हजार २५० रुपये

0

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून एकल पालक असणाऱ्या मुलांना आता २ हजार २५० रुपये मिळतात. या योजनेत पूर्वी १ हजार १०० रुपये मिळत होते. त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. विधवा, घटस्फोटित महिला तसेच अनाथ बालकांना ही योजना मिळवण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडे अर्ज करणे आवश्यक आहे.

महिला व एकात्मिक बालविकास विभागाच्या कार्यालयात (पंचायत समिती) कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडून अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी बालकल्याण समितीसमोर मुलांना समक्ष नेऊन फॉर्म जमा करणे आवश्यक आहे. कोरोनानंतर या योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली असून राज्यातील असंख्य लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.