‘या’ प्रवाशांना मिळणार अवघ्या 20 रुपयांत मिळणार जेवण; भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवण मिळत नसल्याने उपाशी पोटी प्रवास करण्याची वेळ बऱ्याचदा येते. मात्र रेल्वे विभागाने जनरल डब्यातील प्रवाशांना बजेट फ्रेंडली जेवण उपलब्ध करुन दिलं आहे. रेल्वेच्या जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फक्त 20 रुपयांत जेवण मिळणार आहे.
रेल्वे विभागाने जारी केलेल्या निवेदनात लांबपल्ल्याच्या 15 प्रमुख रेल्वे स्थानकांवर 20 रुपयात जेवण उपलब्ध करुन देणार असल्याचं सांगितलं आहे. रेल्वे प्रवाशांना कमी पैशात, पौष्टिक आणि स्वच्छ अन्न मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
यामध्ये महाराष्ट्रातील इगतपुरी, कर्जत, मनमाड, खंडवा, बडनेरा, शेगाव, पुणे, मिरज, दौंड, साईनगर शिर्डी, नागपूर, वर्धा, सोलापूर, वाडी आणि कुर्डूवाडी या स्थानकावर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.