Take a fresh look at your lifestyle.

सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या फायदा…

0

पंतप्रधान पीक विमा योजना :- शेतात लावलेल्या पिकाचे नुकसान झाल्यावर या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाते. नैसर्गिक संकट, कीड लागणे, दुष्काळ पडणे या कारणामुळे शेतकऱ्यांचे पीक गेले, नुकसान झाले तर सरकार अशा शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक वीमा योजनेच्या माध्यमातून मदत करते.

किसान क्रेडिट कार्ड :- किसान क्रेडिट कार्ड हीदेखील शेतकऱ्यांसाठीची एक खास योजना आहे. ही योजना 1998 सालापासून अस्तित्वात असून तिच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चार टक्के व्याजदराने साधारण तीन लाख रुपयांपर्यंत दिले जाते. आतापर्यं या योजनेचा लाभ जवळपास अडीच कोटी शेतकऱ्यांनी घेतलेला आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना :- पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना ही केंद्र सरकारची एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही शेकऱ्याला अर्ज करता येतो. सहा हजार रुपयांची ही मदत शेतकऱ्यांना तीट टप्प्यांत मिळते.