Take a fresh look at your lifestyle.

‘या’ मोबाईल ॲप द्वारे करा माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज

0

आजपासून ‘नारी शक्ती दूत अँपवर ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आज पासून या अँप द्वारे आपण अर्ज करू शकता. परंतु आज अँप वर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरु झाली नाही. मोबाईल नंबर टाकल्यावर पुढील प्रोसेस सुरु झाली नाही.आज उशिरा किंवा उद्या पासून हि प्रोसेस सुरु होईल. तरी इच्छुक अर्जदारांनी खालील लिंक वरून आपल्या मोबाईल मध्ये अँप डाउनलोड करून ठेवावी.

योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आवश्यक दाखल्यांची पूर्तता समन्वयाने व जलदगतीने करावी, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले. ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अंमलबजावणी संदर्भातील बैठकीत महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुप कुमार यादव तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी उपस्थित होते.