डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषि क्रांती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सन 2024-25 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व बिरसामुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) अंतर्गत लाभार्थी निवडीकरीता ऑनलाईन प्रस्ताव नविन विहीर व इतर बाबीसाठी 7/12, होल्डीग, जात प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार कार्ड, व बॅक पासबुक इत्यादी कागदपत्रांसह महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेचे उद्दिष्ट याप्रमाणे आहेत. बदलेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची सिंचनाची आवश्यकता विचारात घेऊन अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना व अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेर) अंतर्गत सिंचन सुविधांचा लाभ देवून त्यांचे उत्पन्नात वाढ करुन जीवनमान उंचावणे व शेतकऱ्यांना स्वंयपूर्ण करण्यासाठी या योजना राबविण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची पद्धत :- लाभार्थी शेतकऱ्यानी या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर अर्ज विहीत नमुन्यात करावा.