परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याण विभागाची विशेष शिष्यवृत्ती योजना
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. तसेच नजिकच्या काळात योजने अंतर्गत पालकांच्या कुटूंबाच्या उत्पन्न मर्यादित तसेच जागांमध्ये वाढ झाल्यास त्यानुसार जाहिरातीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे, सुधारणा करण्याचे व फेरअर्ज मागविण्याचे अधिकार शासन राखून ठेवीत आहे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी (शाहू महाराज स्कॉलरशिप) अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचा अर्ज पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३, चर्च रोड, पुणे-४११००१ येथे सादर करावा.
अधिकृत ई-मेल – fs-sw-edu@gov.in