Take a fresh look at your lifestyle.

“मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करणेबाबत मा.जिल्हाधिकारी यांचे परिपत्रक जारी

0

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण योजना सुरु करण्यास मान्यता देण्यता आलेली आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यान्वयीन यंत्रणांनी खालीलप्रमाणे कार्यवाही तातडीने करावी.

तहसीलदार यांनी करावयाची कार्यवाही :-

1) योजनेच्या लाभार्थी महिलांना मोहीम स्वरुपात उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र निर्गमित करणे.

2) तहसील कार्यालयात उपलब्ध असलेल्या जन्म दाखल्यांच्या अभिलेखांतून ज्या लाभार्थ्यांना जन्म दाखला आवश्यक

आहे, त्यांना जन्म दाखल्यांच्या नक्कला तात्काळ पुरविणेसाठी नियोजन करणे.

3) 5 एकरपेक्षा जास्ती शेतजमीन असलेल्या शेतजमीन धारकांची यादी तयार करुन प्रत्येक तलाठी यांनी संबंधित

अंगणवाडी सेविका यांना तात्काळ देणेबाबत तलाठी यांना निर्देश देणे व अनुपालन झाल्याची खात्री करणे.

गटविकास अधिकारी यांनी करावयाची कार्यवाही :-

1) लाभार्थी महिलांना बँक खाते उघडण्यासाठी तालुक्यातील बँक अधिकारी यांचेशी समन्वय साधणे. सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते उघडले जातील हे सुनिश्चीत करणे.

2) पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध असलेल्या जन्म दाखल्यांच्या अभिलेखांतून ज्या लाभार्थ्यांना जन्म दाखला

आवश्यक आहे, त्यांना जन्म दाखल्यांच्या नक्कला तात्काळ पुरविणेसाठी नियोजन करणे.

3) ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध असलेल्या जन्म दाखल्यांच्या अभिलेखांतून ज्या लाभार्थ्यांना जन्म दाखला

आवश्यक आहे, त्यांना जन्म दाखल्यांच्या नक्कला तात्काळ पुरविणेसाठी नियोजन करणेचे ग्रामसेवक यांना निर्देश

देणे.

4) योजनेच्या अंमलबजावणीसाठी बालविकास प्रकल्प अधिकारी (नागरी/ग्रामीण) यांना आवश्यक सहकार्य करणे.

आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका व मुख्याधिकारी नगरपरिषद यांनी करावयाची कार्यवाही :-

1) महानगरपालिका व नगरपालिका यांचे कार्यालयात उपलब्ध असलेल्या जन्म दाखल्यांच्या अभिलेखांतून ज्या लाभार्थ्यांना जन्म दाखला आवश्यक आहे, त्यांना जन्म दाखल्यांच्या नक्कला तात्काळ पुरविणेसाठी नियोजन करणे.

व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक जळगाव यांनी करावयाची कार्यवाही :-

1) योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे बँक खाते असणे आवश्यक आहे. बँक खाते नसलेल्या लाभार्थ्यांना तात्काळ बँक खाते तयार करुन देणेबाबत जिल्ह्यातील सर्व बँकाच्या शाखाधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत

तालुका आरोग्य अधिकारी व बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी / ग्रामीण) यांनी करावयाची कार्यवाही :-

1) योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात नियोजनबध्द होण्याच्या दृष्टीने तालुकास्तरीय अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांचेत समन्वय ठेवावा. अडचणी आल्यास तात्काळ सोडविणेत याव्यात अथवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जळगाव यांचेशी संपर्क साधावा.

जळगाव जिल्ह्यात “मुख्यमंत्री – माझी लाडकी बहिण ” योजनेची अंमलबजावणी नियोजनबध्द रितीने होईल, लाभार्थ्यांना सुलभ रीतीने योजनेचा लाभ मिळेल, यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी दक्षता घ्यावी.