राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊसतोडणी यंत्र अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊसतोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत ऊसतोडणी यंत्रास अनुदान देणेबाबतच्या दि. २०.०३.२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार एकूण ९०० ऊसतोडणी यंत्रांचे लक्षांक साध्य करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सदर प्रकल्पास दि. राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांकडून व साखर कारखान्यांकडून ऊसतोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी करिता नव्याने अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, ही विनंती विचारात घेता, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊसतोडणी यंत्र अनुदान प्रकल्पासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची सुविधा दि. २४.०६.२०२४ ते दि. ०३.०७.२०२४ या कालावधीकरिता महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

तरी, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) व सर्वसाधारण या प्रवर्गातील इच्छुक वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, तसेच सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था (FPO) यांनी दि. २४.०६.२०२४ ते दि. ०३.०७.२०२४ या कालावधीत महाडीबीटी पोर्टलवर ऊसतोडणी यंत्र अनुदान या घटकासाठी अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.