Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करणेबाबत शासनाकडून कार्यपद्धती जाहीर

0

अतिवृष्टी व पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरीत करणे व सदर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे, याकरीता पुढीलप्रमाणे कार्यपद्धती अवलंबविण्यात यावी:

१) महसूल व वन विभागाच्या दि.८.३.२०१९ च्या शासन निर्णयातील तरतूदीनुसार अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे संबंधित जिल्हाधिकारी यांनी जाहीर करावे. (घोषणापत्र/ अधिसूचना निर्गमित करावी).

२) जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी जिल्हास्तरावरील महसूल विभागाकडून अतिवृष्टी / पूरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांची संख्या, त्यांना आवश्यक असणारे गहू व तांदळाचे प्रमाण, बाधित कुटुंबांची यादी, बाधित झालेल्या एकूण व्यक्तींपैकी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थी व non NFSA लाभार्थ्यांची संख्या, इ.आवश्यक बाबी प्राप्त करून घ्याव्यात.

३) सदर अन्नधान्याचे वाटप जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उपनियंत्रक यांनी त्यांच्याकडे लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिल्लक असलेल्या अन्नधान्यामधून तात्काळ करावे.

४) महसूल व वन विभागाच्या क्रमांक : सीएलएस-२०१८/ प्र. क्र. २२५/म-३, दि. ८.३.२०१९च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार सदर अन्नधान्य आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यानंतर एक आठवड्यात वाटप करावयाचे असल्याने सदर वाटप पूर्ण झाल्यानंतर वाटप केलेल्या अन्नधान्याएवढ्या अन्नधान्याची अतिरिक्त मागणी जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी तात्काळ शासनाकडे करावी.

५) अन्नधान्याची मागणी शासनाकडे करतेवेळी जिल्हाधिकारी यांच्याकडून घोषित करण्यात आलेले घोषणापत्र/अधिसूचना शासनास सादर करावी.

६) सदर अन्नधान्यासाठी आवश्यक असलेला निधी केंद्र शासनाच्या संदर्भाधीन दि.१८.८.२०१७ च्या पत्रामध्ये नमूद केलेल्या दराने (MSP / MSP derived rate ) जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी जिल्हास्तरावरील महसूल विभागाकडून तात्काळ उपलब्ध करून घ्यावा.

७) राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे सदर अन्नधान्याची मागणी केल्यानंतर व त्या अन्नधान्यास केंद्र शासनाची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर त्या मंजूरी आदेशांच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी / अन्नधान्य वितरण अधिकारी / उप नियंत्रक यांनी भारतीय अन्न महामंडळाकडे प्रचलित MSP/MSP derived rate ने रकमा जमा करून अन्नधान्याची उचल करून अतिवृष्टी / पूर परिस्थिती मध्ये वाटप केलेल्या अन्नधान्याचे समायोजन करावे.

८) अतिवृष्टी / पूरग्रस्तांना वाटप केलेल्या अन्नधान्याचा तपशील, महसूल विभागाकडून अन्नधान्याकरीता प्राप्त झालेल्या रकमा, भारतीय अन्न महामंडळाकडे प्रचलित MSP / MSP derivedrate ने जमा केलेल्या रकमा, अन्नधान्याचे समायोजन केलेल्या अन्नधान्याचा तपशील, बाधित झालेल्या एकूण व्यक्तींपैकी NFSA व non-NFSA लाभार्थ्यांचा तपशील, जिल्हाधिकारी यांच्याकडून घोषित करण्यात आलेले घोषणापत्र /अधिसूचना याबाबतची माहिती नापु- २२ कार्यासनास तसेच वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांना तात्काळ कळवावी.