Take a fresh look at your lifestyle.

दिव्यांग शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू

0

राज्य शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार दिव्यांग जिल्हा समन्वयक, विशेष तज्ज्ञ शिक्षक व विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याच निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

याचा लाभ ६ दिव्यांग जिल्हा समन्वयक, ५२ विशेष तज्ज्ञ व १५८ विशेष शिक्षक अशा २१६ कर्मचाऱ्यांना मिळेल.