विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांची फी भरण्यासाठी शैक्षणिक कर्ज….
▪️बाजारात मिळणार्या इतर व्याजदरापेक्षा शैक्षणिक कर्जाचा व्याजदर तुलनेने कमी असतो.
▪️शिक्षण काळात या कर्जाचे हफ्ते भरावे लागत नाहीत.
▪️शिक्षण संपल्यानंतर वर्षभरानंतर या कर्जाचे हफ्ते सुरू होतात (इच्छा असेल तर शिक्षण काळात केवळ व्याजदराचे पैसेही आपण भरू शकतो).
▪️उत्पन्न करात शैक्षणिक कर्जावर सूट मिळू शकते.
▪️शिक्षण सुरू असताना डोक्यावर कर्ज आहे याचा कुठलाही भार सहन करावा लागत नाही किंवा मनस्ताप होत नाही.
▪️त्यामुळे विशिष्ट मुदतीत संपणार्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी (ज्याची विद्यापीठाने ठरवलेली प्रवेश आणि शैक्षणिक फी एकरकमी भरणे सर्वसामान्य पालकांना शक्य नसते).
▪️शैक्षणिक कर्ज घेऊन प्रवेशाची तरतूद करण्यात काहीच धोका नाही.
कर्ज कुठल्या बँकातून घ्यावे
■ ढोबळमानाने सांगायचे तर शक्यतो *राष्ट्रीय बँकातूनच* कर्ज घ्यावे. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, इ. काही बँकांच्या कर्ज योजना चांगल्या आहेत. पण या प्रश्नाचे उत्तर बँकात चौकशी करूनच तुम्हाला शोधावे लागेल कारण तुमची गरज आणि मिळणारे कर्ज यासाठी कुठल्या बॅंकेची योजना योग्य आहे हे तुम्हीच ठरवू शकता.
कर्ज घेताना काय चौकशी करायची
◆ मात्र व्याजदर काय ?
◆ कुठले कागदपत्रं द्यावे लागतील ?
◆ मुदत काय असेल ?
◆ परतफेडीचा हफ्ता किती असेल ?
◆ कधीपासून सुरू होईल ?
◆ त्यासाठी त्या बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे का ?
◆ अशी सगळी माहीती घ्या.
_मात्र एकाच बँकेत चौकशी करू नका. दोन तीन बॅंकात चौकशी करा आणि मग ठरवा कुठल्या बँकेतून कर्ज घ्यायचे. कुठे स्वस्त कर्ज मिळते हे तपासून मगच कर्ज घ्या.
शैक्षणिक कर्जासाठी तारण / गॅरेंटर द्यावेच लागते का?
◆ प्रत्येक बँकेत या बाबतचे नियम वेगळे आहेत. मात्र बहुतांश *बँका तारण* ठेवायला सांगत नाही.
◆ मात्र एक किंवा दोन गॅरेंटर लागतील असं सांगतात. घरचे कौटुंबिक उत्पन्न पुरेसे असले तर आई किंवा वडील, बहीण-भाऊही गॅरेंटर राहू शकतात.
◆ तसे नसेल तर मात्र तुम्हाला गॅरेंटरची व्यवस्था करावीच लागते.
◆ . जर गॅरेंटर नाहीच मिळाले तर बॅंक तारण म्हणून तुमच्या जमिनीचे 7-12 व 8-अ हे उतारे घेते.
कर्ज कुणाच्या नावावर मिळते ?
● कर्ज जो शिकतोय त्या विद्यार्थ्याच्याच नावावर मिळते.
● मात्र बॅंक धनादेश त्या विशिष्ट कॉलेज, संस्थेच्या नावाने देते. त्यामुळे कर्ज देताना बॅंक फक्त एज्युकेशन फी एवढेच पैसे देते.
● तुमची एकूण फी किती आणि त्यासाठी तुम्हाला त्या कॉलेजला / संस्थेला किती पैसे द्यायचे आहेत याचे एक पत्र तुम्हाला संबंधित कॉलेज / संस्थेकडून घ्यावे लागते आणि ते पत्र बँकेत द्यावे लागते.
● एज्युकेशन लोन करात आहात म्हटल्यावर फी भरण्यासाठी पुरेसा वेळही देतात.
● मात्र अनेक संस्थाचालक असे पत्र देण्यास टाळाटाळ करतात कारण फीच्या पलीकडचे पैसे त्यांना त्या पत्रात शुल्क म्हणून दाखवता येत नाहीत. ते पैसे वेगळे देण्याची मागणी ते पालकांकडे करतात.
● त्यामुळे आपण योग्य फी भरतो आहे ना आणि तेवढ्याच रकमेचे पत्र कॉलेज आपल्याला देत आहे ना याची खात्री करा.
कुठल्याही बँकेत, खेड्यापाड्यात ही सोय आहे.
◆ अनेक राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखा खेड्यात, तालुक्याच्या ठिकाणीही आहेत. तिथे चौकशी केली तरी सर्व माहिती मिळेल. यात खेडी / शहर असा फरक नाही.