तरुणांनो, स्वतः चा व्यवसाय करण्यासाठी घ्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या ‘या’ योजनेचा लाभ….
आज आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अशा अनेक जाती जमाती आहेत ज्या दारिद्र्य रेषेखाली आपले जीवन यापन करीत आहे. अणि स्वताचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल म्हणून पुरेसा पैसा जवळ उपलब्ध नसल्यामुळे असे व्यक्ती स्वताचा रोजगार उद्योग व्यवसाय देखील सुरू करू शकत नाही. म्हणुन अशा गरीब तसेच मातंग समाजातील एकूण बारा पोटजाती असलेल्या व्यक्तींना अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ ह्या योजनेच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे.
जेणेकरून त्यांना देखील स्वताचा हक्काचा रोजगार प्राप्त होईल अणि ते आर्थिक दृष्ट्या प्रगती करतील.ह्या योजनेसाठी पात्र ठरत असलेल्या प्रवर्गाकडुन अर्ज मागविण्यास देखील प्रारंभ झालेला आहे. अणि जास्तीत जास्त पात्र तरूणांनी ह्या योजनेसाठी अर्ज करून ह्या योजनेचा लाभ प्राप्त करावा असे आवाहन सुदधा करण्यात आले आहे.
अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारच्या कर्ज योजना राबविल्या जातात.