Take a fresh look at your lifestyle.

‘या’ योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत वाढ….

0

मनरेगा – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांना केंद्र सरकारने मनरेगाच्या मजुरीच्या दरात 3 ते 10 टक्के वाढ केली आहे. गुरुवारी दिनांक 28 मार्च २०२४ रोज यासंदर्भातील अधिसूचना जाहीर करण्यात आली असून हे वाढलेले वेतन दर 2024-25 या आर्थिक वर्षासाठी आहेत. मनरेगा कामगारांसाठी 1 एप्रिल 2024पासून नवीन मजुरी दर लागू होतील. नव्या दरांनुसार आता प्रत्येक राज्यातील कामगारांना जास्त वेतन मिळणार आहे. गोव्यात मजुरीच्या दरात सर्वाधिक वाढ करण्यात आली आहे. गोव्यात सर्वाधिक 10.56 टक्के वाढ झाली आहे. तर उत्तर प्रदेशात केवळ 3.04 टक्के वाढ झाली आहे.

नवे दर :- महाराष्ट्रातील कामगारांना पूर्वी २७३ रुपये प्रतिदिन मिळत होते, ते आता वाढून २९७ रुपये झाले आहे.