Take a fresh look at your lifestyle.

अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांना मिळणार ‘या’ वस्तू…

0

महाराष्ट्र शासनाने यंदाच्या शिवजयंतीपासून ‘आनंदाचा शिधा’ देताना किराणा सामनासोबत आता महिलांना साडी देखील देण्याचा निर्णय बजेटमध्ये जाहीर केला होता. आता त्या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.

अंत्योदय शिधापत्रक धारकांना दरवर्षी एक साडी भेट देण्यात येणार आहे. यामुळे गरीबांना सणावाराला गोडधोड करण्यासोबत घरातील महिलांना नवीन साडी परिधान करुन सण साजरा करता येणार आहे.

आनंदाचा शिधामध्ये साखर, तेल, रवा, चनाडाळ, मैदा, कच्चे पोहे या सहा पदार्थांचा समावेश आहे. अशातच आता अंत्योदय रेशनकार्ड धारक कुटुंबांना यंदा साडी देखील मिळणार आहे.