Take a fresh look at your lifestyle.

तब्बल ‘एवढ्या’ दिवस बँका बंद राहणार; RBI ने जाहीर केली माहिती

0

बँकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मार्च महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहव. त्यानुसार मार्च महिन्यात अनेक सणांमुळे देशभरातील बँका 14 दिवस बंद राहणार आहेत.

यामध्ये पाच रविवार आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार या सुट्ट्यांचाही समावेश आहे. त्यामुळे आपल्या बॅंकेतील व्यवहारांचं योग्य नियोजन करा, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं.

शिवरात्री, होळीचा आणि गुड फ्रायडे या सणांमुळे संपूर्ण देशात बँका बंद राहणार आहेत. मार्च महिन्यात अनेक सण आहेत. त्यामुळे मार्च महिन्यात देशभरातील बँकांना 14 दिवस सुट्या असणार आहेत. तुम्ही या सुट्ट्यांची यादी RBI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.