Take a fresh look at your lifestyle.

PM सूर्य घर मोफत वीज योजना….

0

सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्ज करण्याचे आव्हान केले आहे, ‘पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना’ सुरु केली आहे, हि योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल. पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेच्या माध्यमातून एक कोटी सोलर पेनल देऊन प्रकाशमान होणार आहेत. या योजनेला तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रामध्‍ये घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रणाली बसविण्‍यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल. त्याच वेळी, या योजनेमुळे लोकांना अधिक उत्पन्न मिळवता येईल, त्यांचे विजेचे बिल कमी येईल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होवू शकेल.

पात्रता-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.

अर्जदाराच्या कुटुंबातील एकही सदस्य सरकारी नोकरी करत नाही.

सर्व जातीचे नागरिक या योजनेसाठी पात्र असतील.

अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असावे.

अर्जदाराकडे आपले वीज बिल असावे.

आवश्यक कागदत्रे-

आधार कार्ड

पत्त्याचा पुरावा

आय प्रमाण पत्र

वीज बिल

शिधापत्रिका

मोबाईल नंबर

बँक खाते पासबुक