महाराष्ट्र शासन कृषी विभागाची केंद्र शासन सहाय्यीत सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करणेसाठी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना जाहीर केली आहे या योजने अंतर्गत स्वतःचा प्रक्रिया उद्योग सुरू/विस्तार करण्यासाठी ३५% किंवा १० लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.
मोठे प्रकल्प व सहकारी संस्था, शेतकरी कंपनीसाठी अनुदान
वरील व्यक्तिगत छोट्या प्रकल्प बरोबरच याच योजनेअंतर्गत सामूहिक सुविधा केंद्र व मार्केटिंग व ब्रँडिंग या घटकांतर्गत मोठे प्रकल्प सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, बचत गटांचा फेडरेशन संघ यांच्यासाठी 35 ते 50 % व जास्तीत जास्त 3 कोटी रुपये पर्यंत अनुदान देय आहे.
योजनेचे नाव :- प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना
लाभार्थी :- शेतकरी, युवक, उद्योजक, महिला, चालू उद्योग, शेतकरी कंपन्या, शेतकरी बचतगट, महिला बचतगट, विविध कार्यकारी संस्था, दुग्ध संस्था ,अटल व नाविन्यपूर्ण सहकारी संस्था.

या योजनेमध्ये खाद्यपदार्थांशी निगडित कोणताही अन्न प्रक्रिया उद्योगाचा समावेश करण्यात आलेला आहे. यामध्ये प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया होऊन खाद्यपदार्थ पॅक बंद विक्रीस उपलब्ध केला पाहिजे.
उद्योगांची यादी
उसाचे गुराळ अर्थात गुळ उद्योग, गुळ पावडर तयार करणे, रसवंती गृह (पॅक बंद ऊस रस देणे), चक्की तयार करणे.शेंगदाणा लाडू, राजगिरा लाडू,
१. दूध प्रक्रिया
खवा, बर्फी, पेढे, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, ताक, दही, तूप, लस्सी इ.
२. मसाले प्रक्रिया
चटणी मसाला, कांदा-लसूण मसाला, मालवणी मसाला, मटण-चिकन मसाला, गोडा मसाला.
३. चटणी प्रक्रिया
शेंगदाणा चटणी, खोबरे चटणी, कारळ्याची चटणी, जवसाची चटणी.
४. तेलघाणा प्रक्रिया
शेंगदाणा, सोयाबीन, सुर्यफुल, तीळ, बदाम व सर्व प्रकारची तेल उत्पादने.
५. पावडर उत्पादन प्रक्रिया
काश्मिरी मिरची, लवंगी मिरची, स्पेशल मिक्स, जवारी मिर्ची, धना, जिरा, गुळ, हळद इ.
६. पशुखाद्य निर्मिती
मक्का चुनी, गहू आटा, सरकी पेंड, गोळी पेंड, भरड धान्य इ.
७. कडधान्य प्रक्रिया
हरभरा व इतर डाळी(पॉलिश करणे), बेसन तयार करणे इ.
८. राईस मिल
चिरमुरे, तांदूळ, पोहा प्रक्रिया इ.
९. बेकरी उत्पादन प्रक्रिया
बिस्कीट, खपली गहू बिस्कीट, मैदा बिस्कीट, नानकटाई, क्रीमरोल, म्हैसूर पाक, केक, बर्फी, खारी, टोस्ट, ब्रेड, बनपाव, शेव, फरसाण, चिवडा, भडंग, केळी चिप्स, बटाटा चिप्स, फुटाणे, चिरमुरे इ.