Take a fresh look at your lifestyle.

आरोग्य विभागामध्ये ‘या’ रिक्त पदांची मेगा भरती जाहीर

0

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावर सरळ सेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पदसंख्या-

(अ) एम.बी.बी.एस. व पदव्युत्तर पदवी/पदविका (एकूण- १४४६ पदे)

(ब) बी.ए.एम.एस. व पदव्युत्तर पदवी/पदविका (एकूण- २८३ पदे)

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट “अ” या संवर्गातील “वैद्यकीय अधिकारी (एस-२०) या पदावर सरळसेवेने पदभरती करण्यासाठी http://arogya.maha rashtra.gov.in या संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात / अर्जाबाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांनी https://www.morecruitment.maha-arogya.com या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ONLINE पद्धतीने भरावयाचे आहेत. उपरोक्त नमूद पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेतनश्रेणी, पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क, सूचना, निवडीचे निकष इत्यादी तपशिलासाठी सदर संकेतस्थळाला भेट द्यावी.

विस्तृत जाहिरातीत नमुद केलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन (Online) पद्धतीने दिनांक ०१.०२.२०२४ रोजी सकाळी १०.०० ते दिनांक १५.०२.२०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत. निर्धारित दिनांक व वेळेनंतर तसेच टपालाने अथवा अन्य मार्गाने प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.