महावितरण विभागाची रुफटॉप सोलर योजना…
महावितरणच्या सर्व विज ग्राहकाना सुचीत करण्यात येते की, आपण आपल्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावा व विज बिलापासून मुक्त व्हा. सोलर पॅनलला लागनारा खर्च ५ वर्षात वसूल होईल सोबतच पर्यावरणाचे रक्षण व पैशाची बचत देखील होईल.

योजनेची वैशिष्ट्ये
१. घरगुती बिलात मोठी बचत
२. घरगुती ग्राहक, गृहनिर्माण रहिवाशी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना योजनेचा लाभ
३. १ ते ३ किलोवॅट पर्यंत ४० टक्के अनुदान
४. ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅट पर्यंत २० टक्के अनुदान
५. सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅट पर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना २० टक्के अनुदान,
६. शिल्लक वीज महावितरण प्रति युनिट प्रमाणे विकत घेणार रूफ टॉप सोलारसाठी एक, दोन व तीन किलोवॅटसाठी येणारा खर्च व होणारा लाभ