सैन्यातील निवृत्त जवानांना येथे मिळतेय नोकरीची संधी…
ॲमेझॉन, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. वर्दी घातलेल्या लष्करी कर्मचाऱ्यांवर जगाची नजर असते; पण आता कॉर्पोरेट घराण्यांची नजरही निवृत्त लष्करी जवानांवर आहे. ॲमेझॉन, टाटा मोटर्स, ओएनजीसी, एव्हर एनवायरो आणि विश्व समुद्र समूहासारखे समूह सायबर सुरक्षा, लॉजिस्टिक आणि मानव संसाधन (एचआर) व्यवस्थापनासाठी माजी लष्करी अधिकाऱ्यांवर अवलंबून आहेत. त्यासाठी ते मोठ्या प्रमाणात निवृत्त लष्करी जवानांची भरती करत आहेत. या योजनेंतर्गत निवृत्त लष्करी कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे काम करत आहे. त्यांची विविध पदावर नियुक्ती केली जात आहे.

ॲमेझॉन इंडियाने संरक्षण मंत्रालयासोबत करार केला आहे. ते नौदल, हवाई दल आणि भारतीय तटरक्षक दलातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची भरती करत आहे. गेल्या वर्षी ५६ निवृत्त लष्करी कर्मचारीही फ्लिपकार्ट ग्रुपमध्ये सामील झाले होते. तर ओएनजीसीचे प्रवक्ते म्हणाले की, कंपनीच्या दिल्लीतील मुख्यालयात ८० लष्करी कर्मचारी जोडले गेले आहेत. हे कर्मचारी सुरक्षा, प्रशासन, तपासणी आणि अतिरिक्त सेवेसाठी काम करत आहेत.