नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळात पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे शिक्षण सेवक भरती
नू.म.वि.प्र. मंडळामार्फत चालविल्या जात असलेल्या माध्यमिक विभागाकडील १००% अनुदानित मराठी माध्यमाच्या रिक्त पदांवर पूर्णवेळ १५ माध्यमिक शिक्षण सेवकांच्या नेमणुका करावयाच्या आहेत.

खाली नमूद केलेल्या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करून TET paper 2 किंवा CTET paper 2 पात्र असलेल्या व ‘पवित्र पोर्टल प्रणाली मध्ये नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपला पसंतीक्रम नोंदवून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा.