वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे देणे, आरोग्य विषयक उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आचा लोकसहभागातून विविध आरोग्य को सेयर कार्य करणा-या स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, पत्रकार, क्षेत्रीय कम्मचारी चाहे या उद्देशाने आयोजसाहेब ठाकरे आरोग्य रन पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
पुरस्काराचा तपशील
पुरस्कार देण्यात येणारी संस्था किंवा व्यक्ती
पुरस्काराची रक्कम- १,००,०००/-
पुरस्कार निवडीचे निकष
१. स्वयंसेवी संस्था
संस्था महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावी. धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे किमान पाच वर्षांपूर्वी नोंदणी केलेली संस्था असावी. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांमध्ये लगतचे किमान तीन वर्ष भरीव सहभाग असावा.सनदी लेखापालामार्फत लगतच्या किमान तीन वर्षाचे लेखापरीक्षण झालेले असावे.आरोग्य विषयक जनजागृती चे विशेष कार्यक्रम, मेळावे, शिबिरे आयोजन व आरोग्यसेवा यामध्ये सक्रिय सहभाग असावा.
आरोग्य सेवेत महिला व बाल आरोग्यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्यात आलेले असावेत.दुर्गम भागात आरोग्य विषयी उपक्रम राबविलेले असावेत.आरोग्य सेवेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून दुर्बल घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणलेले असावेत. आरोग्य शिक्षण विषयक उपक्रम राबविलेले असावेत.
२. वैयक्तिक पुरस्कार
किमान दहा वर्ष अखंड सेवा असावी, संस्था, रुग्णालय यांच्या कार्यामध्ये उल्लेखनीय सहभाग असावा. कार्याची गुणवत्ता चांगल्या पद्धतीची असावी. सहकारी व सामान्य जनतेशी सौजन्यपूर्ण संबंध असावेत, आरोग्य सेवेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण कार्यक्रम राबवून दुर्बल घटकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडून आणलेले असावेत. आरोग्य शिक्षण विषयक उपक्रमांमध्ये सहभाग घेतलेला असावा.

प्रत्येक पुरस्काराच्या वर्गासाठी वेगळे निकष असतील, या पुरस्काराकरिता गठित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीतर्फे, योजनेअंतर्गत पुरस्कारासाठी गुणांकन व शिफारसीकरीता पात्रता याबाबत वरील प्रमाणे निकष विचारात घेण्यात येतील.
बरील सर्व दर्शकामाठी केलेल्या कामगिरी नुसार गुण देण्यात येतील व या गुणांकनानुसार सर्वोत्कृष्ट पुरस्काराध्यर्थ्यांची निवह करण्यात येईल.
जिल्हा शला चिकित्सक यांच्या शिफारशी सहित प्रस्ताव उपसंचालक, ‘राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभाग, ‘परिवर्तन’ इमारत, विश्रांतवादी पोलीस स्टेशन समोर, आळंदी रोड येरवडा – ०६ येथे दिनांक २६ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६ वाजेपगेत पाठवावेत.