संविधान जागर अभियान २०२३-२४ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विवेक विचार मंच महाराष्ट्र द्वारे संविधान जागर अभियान २०२३-२४ राबविले जात आहे. या अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय व्हिडिओ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
वकृत्व स्पर्धेचे विषय
१) माझ्या जगण्यातील संविधान
२) सामाजिक न्यायाची वाटचाल व भारतीय संविधान
३) १९७५ ची आणीबाणी व संविधान संरक्षक चळवळी
४) संविधानासमोरील माओवादी व जिहादी आव्हाने
५) धर्मनिरपेक्षता आणि धर्मस्वातंत्र्य
६) समान नागरी कायदा
७) स्वातंत्र्योत्तर भारताचा संविधानिक प्रवास
८) महिला सक्षमीकरण व भारतीय संविधान
९) नागरिकांचे संवैधानिक मुलभूत कर्तव्ये
पारितोषिक
– प्रथम क्रमांक – ७०००/- ( पाच हजार रोख + दोन हजार रुपये किमतीचे पुस्तके व प्रशस्तीपत्र)
– द्वितीय क्रमांक – ५०००/- ( तीन हजार रोख + दोन हजार रुपये किमतीचे पुस्तके व प्रशस्तीपत्र)
– तृतीय क्रमांक – ३०००/- ( दोन हजार रोख + एक हजार रुपये किमतीची पुस्तके.
– ०५ उत्तेजनार्थ – १५००/- ( पाचशे रुपये रोख व एक हजार रुपयांची पुस्तके )
स्पर्धेची प्रक्रिया व नियम
१) ही स्पर्धा नि:शुल्क असून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सोबत दिलेल्या गुगल फॉर्म लिंक किंवा QR कोड ला स्कॅन करून गुगल फॉर्म मध्ये आवश्यक माहिती भरावी व फॉर्म च्या शेवटी “Add File” या पर्यायावर क्लिक करून व्हिडीओ फाईल अपलोड करावी. (काही अडचण आल्यास संपर्क साधावा.)
२) व्हिडिओ हा ०३ ते०५ मिनिटांचा असावा.
३) व्हिडिओ पाठवण्याची अंतिम तारीख २० जानेवारी २०२४ असेल.
४) वय वर्ष १८ ते ४५ या वयोगटातील स्पर्धक या स्पर्धेसाठी पात्र असतील.
५) व्हिडिओ शूट करताना प्रकाशयोजना, ध्वनिमुद्रण व गुणवत्तेचा विचार करावा व व्हिडिओ शूट करताना शक्यतो आडव्या फ्रेम मध्ये तयार करावा. (साईज १६:९)
६) विजेत्यांस पारितोषिक रक्कम बँक अकाउंट ला जमा करण्यात येईल. पुस्तके व प्रशस्तिपत्र प्रत्यक्ष किंवा कुरिअर द्वारे पाठवण्यात येईल. पारितोषिक वितरण कार्यक्रम घ्यायचे ठरल्यास वेळ व ठिकाण कळवले जाईल.
७) वक्तृत्व स्पर्धेची भाषा- मराठी, हिंदी किंवा इंग्रजी.
८)निवडक व्हिडिओ विवेक विचार मंच च्या सोशल मिडिया द्वारे प्रसिद्ध केले जातील.
९) सर्व सहभागींना सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात पाठवण्यात येईल.

संपर्क क्रमांक
अरूण कराड – 7744907983
बेबी कांबळे – 9919148064