Take a fresh look at your lifestyle.

सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना…

0

महाराष्ट्र राज्यातील अधिवासी असलेल्या “मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी-मराठा” जातीतील गुणवंत मुला-मुलीना “महाराजा सयाजीराव गायकवाड-सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अंतर्गत सन २०२३-२४” करिता पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी.) विशेष अध्ययन करण्यासाठी रिक्त राहिलेल्या जागांसाठी विद्यार्थ्यांकडून शिष्यवृतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यातील मराठा, कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी-मराठा जातीतील ज्या विद्यार्थ्यांनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षांत पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पीएच.डी) अभ्यासक्रमाकरिता QS (Quacquareli Symonds) World Ranking २०० च्या आत रॅन्कींग गलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतला असेल अशा विद्यार्थ्यांकरीता नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक सारथी २०२२/प्र.क्र.२८९/का. १४२५० अ दि. २० जुलै २०२३ नुसार सदर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेअंतर्गत पात्र उमेदवाराकडून शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी ऑनलाइन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शासन निर्णय क्र. सारथी- २०२३/प्र.क्र.३५/का. १४२५-अ दि. ०६ नोव्हेंबर, २०२३ नुसार या शिष्यवृत्तीकरिता पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका जागासाठी १८ विद्यार्थी व डॉक्टरेट (Ph.D) करिता ०३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित जागांसाठी विद्यार्थ्यांनी खालीलप्रमाणे शाखानिहाय /अभ्यासक्रमनिहाय अर्ज करावेत.

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष

उमेदवार व उमेदवाराचे आई वडील अथवा पालक भारताचे नागरिक तसेच महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असावेत.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश घेतलेल्या व प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या परदेशातील शैक्षणिक संस्थेचे अद्यावत (सन २०२३) मधील) QS (Quacquarelli Symonds) World Ranking २०० च्या आत असणे बंधनकारक आहे.

या योजनेच्या सविस्तर अटी व शर्ती, पात्रता, वयोमर्यादा, शैक्षणिक अर्हता मिळणारे लाभ व निवड पद्धत, सुधारित वेळापत्रक इत्यादी माहितीकरिता सारथी संस्थेचे संकेतस्थळास https://sarthi- maharashtragov.in/ वेळोवेळी भेट द्यावी.