Take a fresh look at your lifestyle.

सारथी मार्फत मोफत ‘ड्रोन पायलट’ प्रशिक्षण…

0

राज्यातील लक्षित गटातील शेतकरी / युवक/युवती यांना छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे प्रायोजित महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थेमार्फ़त ड्रोन पायलट प्रशिक्षण देणेकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

योजनेचा उद्देश :- सारथी लक्षित गटातील सदस्यांकरिता महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत DGCA मान्यता प्राप्त आरपीटीओ केंद्रामध्ये ड्रोन पायलट प्रशिक्षण देणे.

प्रशिक्षणासाठी पात्रता निकष 

१. प्रशिक्षणार्थी लाभार्थीचे वय १८ ते ४० वर्षे असावे.

२. लाभार्थी कृषी पदवीधर अथवा कृषी पदविका धारक असावा. मात्र असे लाभार्थी अर्ज न आल्यास अन्य विषयांचे पदवीधरांचा विचार करण्यात येईल.

३. मागील ३ वर्षाचे वार्षीक उत्पन्न हे र.रु.८.०० लाखापेक्षा जास्त नसावे अथवा सक्षम प्राधिका-यांचे आर्थिक दुर्बल प्रमाणपत्र (EWS) असावे.

४. प्रशिक्षणार्थी लाभार्थीकडे वैध पासपोर्ट असावा.

५. वैद्यकीय योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्र असावे

६. शेतकरी कुटुंबातील सदस्यास प्राधान्य दिले जाईल.

अर्ज प्रक्रिया :- प्रशिक्षणासाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज https://sarthi-maharashtragov.in/या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

प्रशिक्षणाचे ठिकाण :- महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहूरी कॅम्पस

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारिख:- ३१-०३-२०२४

कागदपत्रे हार्ड कॉपी सारथी संस्थेस पाठविण्याची शेवटची तारीख :- ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर १५ दिवसाचे आत