Take a fresh look at your lifestyle.

डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता रकमेत वाढ…

0

राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई, उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व कला संचालनालय, मुंबई यांच्या अखत्यारितील शासकीय, शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालये, अंशत: अनुदानित (टप्पा अनुदान) व कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतने / सार्वजनिक विद्यापीठे (अभिमत विद्यापीठे / स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) व सार्वजनिक विद्यापीठांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमांस शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे

(व्यवस्थापन कोट्यातील व संस्थास्तरावरील प्रवेश वगळून) प्रवेशित विद्यार्थ्यापैकी, ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व निर्वाह खर्च भागविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून खालील सुधारीत दराने निर्वाह भत्ता, पात्र विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.