Take a fresh look at your lifestyle.

शेततळ्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ; लवकर घ्या योजनेचा लाभ…

0

शेततळे करण्यासाठी शेतकऱ्यांना सरकारकडून अनुदान दिलं जाते. अशातच वैयक्तिक शेततळ्यांसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ करण्यात आली आहे. दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या बळीराजाची या योजनेला सर्वाधिक पसंती आहे.

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घ्यायचा आहे, त्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या नावावर किमान 0.6 हेक्टर क्षेत्र जमीन असावी लागते. जमीन शेततळे खोदण्यास योग्य असणे आवश्यक आहे. तसेच शेततळे, सामूहिक शेततळे किंवा इतर शासकीय योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेले नसावे.

आवश्यक कागदपत्रे 

▪️शेत जमिनीचा सात-बारा आणि ८-अ उतारा,

▪️आधारकार्ड झेरॉक्स

▪️बँक पासबुक झेरॉक्स

▪️हमीपत्र आणि जातीचा दाखला

ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन http://mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावा.