Take a fresh look at your lifestyle.

महिला बचत गटांना मिळणार 80 टक्के अनुदान; ‘या’ योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी…

0

केंद्रीय मंत्रिमंडळाने महिला बचत गटांच्या ड्रोन योजनेसाठी 1 हजार 261 कोटी खर्चाला मंजूरी दिली आहे. या योजनेतून महिला बचत गटांना 8 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे. 2024 ते 2026 या कालावधीत देशातील 15 हजार महिला बचत गटांना या योजनेच्या माध्यमातून ड्रोन खरेदीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. महिला बचत गट शेतकऱ्यांना भाडेतत्वार ड्रोन उपलब्ध करून देतील.