Take a fresh look at your lifestyle.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या ‘या’ योजनांचा लाभ आपण घेतला का?

0

● उद्देश

• मातंग समाज व त्यांच्या १२ पोटजाती यांचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास व्हवा.

● विशेष अर्थ सहाय्य योजना

• अनुदान योजना: १ लाख पर्यंत उत्पन्न असणाऱ्या गरजूंना स्वयंरोजगार व रोजगार अनुदान उपलब्ध होण्याकरिता ५० हजार पर्यंत प्रकल्प असणाऱ्यांना कर्ज

• प्रशिक्षण योजना (कौशल्य विकास व उद्योजगता प्रशिक्षण योजना): मातंग समाजाच्या युवक / युवतींना स्वयंरोजगार मिळण्यास मदत निधी: विशेष सहाय्य

योजनेच्या एकूण निधी पैकी १० % निधी यास असतो.

● बीज भांडवल योजना

• ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रु. १ लाखापर्यंत आहे त्यांना रु. ५०,००१ ते रु. ७,००,०००/- पर्यंत गुंतवणूक असलेल्या वैयक्तिक राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज मंजूर करण्यात येते. यामध्ये महामंडळाचा सहभाग हा २०%, अर्जदाराचा ५% असतो, ७५% बैंक कर्ज.

● थेट कर्ज योजना

• दारिद्र्य रेषेखालील लाभार्थीना स्वयंरोजगार उपलब्ध होण्याकरिता रु.१,००,०००/- कर्ज निधी. ४% व्याजदर ३६ हफ्त्यांमध्ये परतफेड

● शैक्षणिक कर्ज योजना

• अभियांत्रिकी, वैद्यकीय, माहिती तंत्रज्ञान आदी उच्च स्वरूपाचे (देशात व परदेशात) शिक्षणाकरिता अर्थ सहाय्य

• देशात शिक्षणाकरिता रु. १०,००,०००/- पर्यंत कर्ज, परदेशात शिक्षणाकरिता रु. २०,००,०००/- पर्यंत कर्ज, पुरुषांसाठी ४% व्याजदर, स्त्रियांसाठी ३.५% व्याजदर

●अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ: https://slasdc.org/