Take a fresh look at your lifestyle.

‘या’ घटकांना मिळणार महात्मा फुले विकास महामंडळ मार्फत अल्पदरात कर्ज…

0

● महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील दुर्बल घटकांना व्यवसायाकरिता अल्पदरात कर्ज देऊन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.

● अनुदान योजना

• रु. ५०,०००/- पर्यंत प्रकल्प गुंतवणूक असणाऱ्या व्यावसायीकांना रु. १०,०००/- पर्यंत किंवा ५०% अनुदान महामंडळाकडून व ५०% रक्कम एवढे कर्ज रूपाने बँकेकडून,

● बीज भांडवल योजना

• यामध्ये रु. ५,००,०००/- पर्यंत गुंतवणूक असणारे प्रकल्प विचारात घेतले जातात.

• २०% महामंडळ (व्याजदर ४% )

• ५% अर्जदार

• ७५% बँक

• परतफेडीचा कालावधी ५ वर्षे

● थेट कर्ज योजना

• प्रकल्प मर्यादा रु. १,००,०००/- पर्यंत,

• महामंडळाचा सहभाग रु.८५,०००/- (अनुदान रु. १०,०००/-)

• अर्जदाराचा सहभाग : रु.५,०००/-

• कर्जाची परतफेड समान मासिक हफ्त्यानुसार ३६ महिन्यात

• कर्जावर व्याजदर ४%

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ:

https://mpbcdc.maharashtra.gov.in/Home/Index